Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : नववर्षाच्या सुरुवातीस 'जीवनत्याग'; उपनगरला प्राध्यापिकेसह पंचवटीत रिक्षाचालकाची आत्महत्या,...

Nashik Suicide News : नववर्षाच्या सुरुवातीस ‘जीवनत्याग’; उपनगरला प्राध्यापिकेसह पंचवटीत रिक्षाचालकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नववर्ष स्वागताच्या जल्लोषात नाशिक (Nashik) उजळून निघाले असताना, सन २०२६ च्या पहिल्याच दिवशी शहराला तीन आत्महत्यांच्या घटनांनी हादरविले. एका प्राध्यापिकेसह रिक्षाचालक आणि एका व्यक्ति अशा तिघांनी १ जानेवारी रोजी गळफास घेऊन ‘आयुष्य’ संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मानसिक ताणतणाव, जबाबदाऱ्यांचा वाढता ताण,रोजगार आणि सामाजिक वास्तव या तिन्ही घटनांनी अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

पुणे रोडवरील (Pune Road) उपनगर भागात राहणाऱ्या तन्वी दिलीप दमेर (वय ३२, रा. ओमदिव्य, शांतीपार्क) या प्राध्यापिकेने आत्महत्या केली. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तन्वी यांच्याबाबत आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. कौटुंबिक कलहासह अन्य कारणांनी पतीशी विभक्त झाल्याने तन्वी मानसिक तणावात होत्या. त्यातच, मुलाची शैक्षणिक जबाबदारी व इतर बाबींनी ग्रस्त असताना त्यांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजता घरातील किचनमध्ये गळफास घेतला. उपनगर पोलीस तपास करत आहेत.

YouTube video player

दुसऱ्या घटनेत गुरुवारी (दि. १) पंचवटीतील मधुबन कॉलनीतील ‘दीपाली डी’ सोसायटीत राहणाऱ्या हर्षल गणेश भावसार (वय ३१) या रिक्षाचालकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पेलणाऱ्या हर्षलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगरकोसळला असून आर्थिक ताण, अनिश्चित उत्पन्न असे कारण प्राथमिक तपासात समोर येत आहे. पंचवटी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, तिसऱ्या घटनेत सिडकोतील उपेंद्रनगरात ४२ वर्षीय विकास दिलीप वारे (रा. साईग्राम रो हाऊस) यांनी गुरुवारी (दि. १) दुपारी साडेतीन वाजता घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या प्रकरणातही आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) नोंद आहे.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...