Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : परिचारिकेची रुग्णालयात आत्महत्या

Nashik Suicide News : परिचारिकेची रुग्णालयात आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील एका नामांकित रुग्णालयात (Hospital) शिकाऊ परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुणीने रुग्णालयाच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर

तन्वी नाना भदाणे (वय २५, रा. कळवण) या गेल्या दीड वर्षांपासून नाशिकरोड (Nashik Road) येथील रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रुग्णालय प्रशासनाने वरच्या मजल्यावर परिचारिकांसाठी निवासाची व्यवस्था केली होती. शुक्रवारी दुपारी काम आटोपल्यानंतर तन्वी या आपल्या खोलीत गेल्या होत्या. शनिवारी दुपारी सहकारी परिचारिकांनी दार उघडून पाहिले असता, तन्वी या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास सुरू आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...