Thursday, May 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सुनियोजित 'हनी ट्रॅप'; कॉर्पोरेट छळाचा 'नाशिक पॅटर्न' उघड

Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात (IT and Corporate Sectors) काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणी आता सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. एका नामांकित कंपनीत (Company) ज्या पद्धतीने तरुणींना टार्गेट करण्यात आले, ते पाहता हा केवळ वैयक्तिक विनयभंग नसून, तो एका विशिष्ट मानसिकतेतून रचलेला ‘संघटित छळ’ असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर

या प्रकरणातील (Case) सर्वात भयावह पैलू म्हणजे पीडितांची निवड करण्यात येत होती. ज्या तरुणी साडी नेसतात किंवा भारतीय (Indian) परंपरा पाळतात, त्यांना जाणीवपूर्वक ‘सॉफ्ट टार्गेट’ बनवण्यात आल्याचे अनेक तक्रारींतून उघड झाले आहे. संशयितांनी केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक छळही केला. बाहेर फिरायला जाऊ अशा ऑफर देत रिसॉर्टवर नेणे आणि तिथे अत्याचार करणे, हा या टोळीचा कट होता. हे संशयित एकाच परिसरातील असल्याने त्यांनी कंपनीच्या आत स्वतःचे एक अघोषित ‘नेटवर्क’ तयार केले होते, असे उघड होत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॅकेट; छळवणुकीला ‘एचआर’ ची साथ, महिलेस पुण्यातून अटक

बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा असतो. असे असतानाही संशयित (Suspeted) दानिश शेख आणि तौसिफ अख्तर यांनी कंपनीच्या लॉबी, पॅन्ट्री आणि मीटिंग रूममध्ये तरुणींना पकडण्यापर्यंत मजल मारली. हे सर्व घडत असताना कं पनीचे व्यवस्थापन गप्प का होते? तक्रार करूनही जेव्हा अधिकारी संशयितांना पाठीशी घालतात, तेव्हा त्या कंपनीच्या ‘इंटरनल कंप्लेंट कमिटी’ च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

हे देखील वाचा : Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना आयशर ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

धर्मांतराचा ‘हिडन अजेंडा’?

केवळ लैंगिक अत्याचार करून हे संशयित थांबले नाहीत. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावणे, हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरणे आणि बळजबरीने मांसाहार व नमाज पठणाची सक्ती करणे, यावरून यामागे एखादा धर्मांतराचा छुपा अजेंडा होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. लव्ह जिहाद’च्या छायेत तर हे प्रकरण जात नाही ना? अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : माणुसकीला तेलाचा चटका; ‘ती’ आली, तेल मागितले आणि सुनेचा कोळसा करण्याचा प्रयत्न

स्पॉट पचनामे, मोक्काची पडताळणी

२५ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाने कंपनीत धडक दिली. एका तरुणीने हिंमत दाखवताच इतर पीडित तरुणींचेही बिंग फुटले. त्र्यंबकेश्वर रोडवरील ते ‘बदनाम’ रिसॉर्ट आणि टेकडीवरील एकांत, जिथे या नराधमांनी पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त केले, तिथे आता तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. पंचनामे केले जात आहेत. या प्रकरणातील ‘मोका’ अंतर्गत कारवाईची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची ‘मॅनेजमेंट’ गँग; पंधरा गुन्ह्यांनंतरही ‘मॅनेजमेंट टीम’ एसआयटीच्या रडारबाहेरच!

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...