Saturday, April 18, 2026
HomeनाशिकNashik Crime News : नाशिकच्या 'निदा'ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन...

Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईनाका परिसरातील (Mumbai Naka Area) बहुराष्ट्रीय कंपनीत सुरू असलेल्या धर्मांतर आणि शोषणाच्या घटनेत निदा खान (Nida Khan) नावाचाच ब्रेन असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदू तरुणींना जाळ्यात ओढणेच नव्हे, तर त्यांना नमाज पठणापासून ते मुस्लीम पेहरावापर्यंतचे प्रशिक्षण देण्याचे मिशन निदानेच राबवल्याचा खळबळजनक खुलासा नाशिक एसआयटीच्या तपासात झाला आहे. दरम्यान, हे उघड होताच लेडी खान मोबाईल फेकून पसार झाली असून ती सध्या भिवंडीत दडून बसल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॅकेट; छळवणुकीला ‘एचआर’ ची साथ, महिलेस पुण्यातून अटक

या प्रकरणातील (Case) इतर संशयित ड्रायव्हर्स, मदतनीस होते, मात्र खरा ब्रेनवॉश निदा खान करत होती. संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख आणि इतरांच्या मदतीने तिने कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींना टार्गेट केले. धक्कादायक म्हणजे, धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्यानंतर या तरुणींना मुस्लीम धर्माच्या चालीरीतींचे रितसर कोचिंग निदा खान देत होती, असे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली

मात्र, पोलिसांच्या (Police) कारवाईनंतर आणखी तीन पीडित तरुणींनी समोर येत आपबिती सांगितली. सध्या पोलीस त्यांचे समुपदेशन करत असून, या तिघींनी अधिकृत फिर्याद दिल्यास गुन्ह्यांची संख्या ११ किंवा १२ वर पोहोचणार आहे, असे कळते. एसआयटीचे प्रमुख संदीप मिटके यांच्या सूचनेने तपास सुरू आहे. पथक आता भिवंडीत निदा खानच्या मुसक्या आवळण्यासाठी तळ ठोकून आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना आयशर ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

निदा गायब; अकाऊंट डिलिट

गुन्हा (Case) दाखल झाल्याची कुणकूण लागताच निदाने मोबाईल स्विच ऑफ केला व कालांतराने इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले. संशयितांनी धर्मांतराच्या प्रचारासाठी व्हॉटस्अॅप आणि टेलिग्रामचा प्रभावी वापर केला. एसआयटीने आता सर्व संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असून, निदाच्या अटकेनंतर या जिहादचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक; मोठा अनर्थ…

ताज्या बातम्या

Jewelry Theft : उंबरी बाळापूर येथे कुऱ्हाड व कतीचा धाक दाखवून...

0
आश्‍वी । वार्ताहर संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर आणि आश्‍वी बुद्रुक परिसरात शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी अंदाजे...