Friday, May 3, 2024
Homeक्रीडाराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिकचा संघ रवाना

नाशिक । Nashik

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे धुळे व शिरपूर येथे आयोजित 19 वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेसाठी, नाशिकचा जिल्हा क्रिकेट संघ रवाना झाला आहे.

- Advertisement -

नाशिकचा समावेश असलेल्या उत्तर विभागात धुळे, जळगाव व नंदुरबार हे इतर तीन संघ आहेत. 3 ते 6 मार्च दरम्यान सदर संघांमध्ये, 50 षटकांचे एक दिवसीय साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. नाशिकचा पहिला सामना 3 मार्च रोजी धुळे संघाबरोबर धुळे येथे होणार आहे. त्यासाठी नाशिकचा जिल्हा क्रिकेटचा 14 जणांचा संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक शांताराम मेणे धुळे येथे रवाना झाला आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट निवड समितीचे तरुण गुप्ता, सतीश गायकवाड व शिवाजी जाधव ह्यांनी शनिवार 27 फेब्रुवारीपासून विविध टप्प्यांत पार पडलेल्या निवड चाचणी प्रक्रियेनंतर सदर निवड घोषित केली.

नाशिकचा जिल्हा क्रिकेट चमू असा : यशराज खाडे (कर्णधार), शर्विन किसवे, स्वप्नील शिंदे, सौरभ वाणी, ओम घाडगे, मुस्तांसिर कांचवाला, आदित्य लढ्ढा, रविंद्र मछ्या, गुरवीरसिंग सैनी, प्रतीक तिवारी , रितेश तिडके, ऋषिकेश कातकाडे, अभिषेक जंगम व गुरमानसिंग रेणू.

- Advertisment -

ताज्या बातम्या