Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : तापमान ११.५ अंशांवर; नाशिकची थंडी कमी होण्याची शक्यता

Nashik News : तापमान ११.५ अंशांवर; नाशिकची थंडी कमी होण्याची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कालपर्यंत ८.५ अंशांवर घसर- लेला तापमानाचा (Temperature ) पारा आज ३ अंशांनी वाढला. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज नाशिकचे तापमान ११.५ अंशांवर पोहोचले. कमाल तापमान २८ अशांवर स्थिरावले.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात केवळ थोड्याच कालावधीसाठी नावापुरते रूपांतरित झालेले व फारच धिम्या गतीने मार्गक्रमण करणारे ‘फिंजल ‘चक्रीवादळ काल रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाँडिचेरीजवळ आदळले. त्यानंतर चक्रीवादळ कमकुवत होऊन आज त्याचे हवेच्या अति तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबरदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Rain Update News : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याचा अंदाज

उत्तर भारतातून नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी (Cold) घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना बंगालच्या उपसागरातून ‘फिंजल’ चक्रीवादळाच्या बाह्यपरिघ फेरीतून काटकोनातून, म्हणजे पूर्वेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे अटकाव केला जात आहे. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंपाषष्टीपर्यंतच्या (दि.७) आठवड्यात पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल अशा दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होईल. परिणामी महाराष्ट्रात आठवडाभर थंडी कमी होणार आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच छत्रपती संभाजींनगर या ५ जिल्ह्यांत मात्र या वातावरणाचा थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नाही. येथील थंडी टिकून राहील. दि.८ डिसेंबरनंतर थंडीत पुन्हा वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...