Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRain Update News : 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; 'या' जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याचा अंदाज

Rain Update News : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याचा अंदाज

मुंबई | Mumbai

भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ फेंगल हे चक्रीवादळ (Fengal Cyclone) घोंगावतं आहे. या वादळाचा महाराष्ट्रालाही (Maharashtra) फटका बसणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पाऊस (Rain) कोसळणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळपासून राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच थंडी देखील कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी म्हटले आहे की, फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल चांगला झाकून ठेवा, असा सल्लाही डख यांनी दिला आहे. दुसरीकडे ०६ डिसेंबरेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या