नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान (Voting) होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक असून, नाशिकमध्ये (Nashik) शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची (Nashik Vidhan Parishad Election) जागा शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला आली असून, त्यांनी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुती-मविआमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडे; माजी आमदारांना उमेदवारी, गणेश गितेंच्या भूमिकेकडे लक्ष
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) नाशिकची जागा ठाकरे गटाला सुटली होती. त्यानंतर त्यांनी येथून निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता या निवडणुकीतून ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) माघार घेण्याची शक्यता आहे. मतदारांचे संख्याबळ जुळत नसल्याने ठाकरेंची शिवसेना हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते. याबाबतची अधिकृत घोषणा ठाकरे सेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद मिर्लेकर थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत करणार असल्याचे समजते.
दरम्यान, शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी आमदार सुहास कांदे गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पत्नी अंजुम कांदे या विधानपरिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पंरतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) नाराज असल्याचे बोलले जाते. तर मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी महायुतीचे पारडे असल्याचे बघायला मिळत आहे.




