Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीच्या विष्णू म्हैसधुणे, गोरख बोडके यांची निवडणुकीतून...

Nashik Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीच्या विष्णू म्हैसधुणे, गोरख बोडके यांची निवडणुकीतून माघार; गोकुळ गितेंच्या निर्णयाकडे लक्ष

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. तर दि.२२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्याकरिता आज (दि.०४ जून) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीसाठी वेळ आहे. या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता नाशिक विधान परिषद निवडणुकीतून (Nashik Vidhan Parishad Election) राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांनी माघार घेतली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : मंत्री महाजनांच्या मध्यस्थीला यश! गणेश गिते माघार घेण्याची शक्यता, तर गोकुळ गिते निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने दराडेंची डोकेदुखी वाढली होती. परंतु, मंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गिते यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर त्यांचे बंधू गोकुळ गिते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णू म्हैसधुणे आणि प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके (Gorakh Bodke) यांनी देखील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काल शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे यांनी म्हैसधुणे आणि बोडके यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर, नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे आणि येवल्याचे नगरसेवक रामदास दराडे यांच्यासह विष्णू म्हैसधुणे आणि गोरख बोडके जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झाले. यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : शहरातील नामवंत बिल्डरांना ‘एमपीआयडी’; म्हाडा घोटाळ्यानंतर सरकारवाडा पोलिसांत दुसरा गुन्हा

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अर्ज मागे घेतल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अद्यापही उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत गोकुळ गिते (Gokul Gite) आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Update: आनंदवार्ता आलीच! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान...

0
मुंबई | Mumbaiगेल्या अनेक दिवसांपासून चातका सारखी वाट बघणाऱ्या मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे अखेर आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून...