Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : अर्ज माघारीची मुदत संपली; गोकुळ...

Nashik Vidhan Parishad Election : अर्ज माघारीची मुदत संपली; गोकुळ गितेंची उमेदवारी कायम, महायुतीच्या नरेंद्र दराडेंशी होणार लढत

गणेश गितेंची माघार

नाशिक | Nashik

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचे (Nashik Vidhan Parishad Election) चित्र आज (गुरुवारी) अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून रस्सीखेच पाहायला मिळाली.

- Advertisement -

भाजपचे बंडखोर गणेश गिते (Ganesh Gite) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून आपला उमेदवारी अर्ज शेवटचे दहा मिनिटे शिल्लक असताना मागे घेतला. तर त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता आज (दि.०४ जून) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत होती. माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या प्रमाणावर हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीच्या विष्णू म्हैसधुणे, गोरख बोडके यांची निवडणुकीतून माघार; गोकुळ गितेंच्या निर्णयाकडे लक्ष

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची माघार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णू म्हैसधुणे आणि प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी देखील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काल शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे यांनी म्हैसधुणे आणि बोडके यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर, नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे आणि येवल्याचे माजी नगरसेवक रामदास दराडे यांच्यासह विष्णू म्हैसधुणे आणि गोरख बोडके जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेतला.

आमचा बाप काढला

दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकासोबत फोनवर बोलतांना “गणेश आणि गोकुळ गिते यांच्या बापाला देखील माघार घ्यावी लागेल”, असे बोलल्याचे आरोप केला. त्यामुळे मी माघार घेणार नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : मंत्री महाजनांच्या मध्यस्थीला यश! गणेश गिते माघार घेण्याची शक्यता, तर गोकुळ गिते निवडणूक लढण्यावर ठाम

ताज्या बातम्या

BRICS

BRICS Summit 2026:’आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’ BRICS परिषदेतून PM मोदींचा संदेश,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित BRICS शिखर परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे स्वागत...