Friday, May 3, 2024
Homeनाशिकस्वच्छता मुकादमाची तत्परता; असे मिळाले मांजात अडकलेल्या पक्ष्याला जीवदान

स्वच्छता मुकादमाची तत्परता; असे मिळाले मांजात अडकलेल्या पक्ष्याला जीवदान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर रोडवरील झाडावर फांदी आणि मांजात अडकलेल्या कावळ्याला महापालिका आणि वॉटरग्रेसच्या स्वच्छता मुकादम यांच्या तत्परतेने जीवदान मिळाले आहे. इकबाल मणियार असे मुकादमचे नाव आहे….

- Advertisement -

गंगापूर रोडवरील प्रभाग क्रमांक ७ येथे एस टी कॉलनी परिसरात स्वच्छता करत असताना मुकादम मणियार यांना झाडावर कावळा अडकल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी स्वच्छता निरीक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून माहिती दिली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचत शिडी आणि काठीच्या सहाय्यने कावळा खाली उतवरला; मात्र, पंख आणि पाय मांजात अडकले असल्याने कावळ्याला उडता येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सावधगिरी बाळगत मणियार यांनी कावळ्याच्या पंख आणि पाय यातून मांजा अलगद काढत कावळ्याला जीवदान दिले.

सकाळी स्वच्छता कर्मचारी यांच्याकडे लक्ष देत असताना माझे लक्ष कावळ्याकडे गेले. तो अडकल्याचे समजताच मी अग्निशमन दल आणि स्वच्छता निरीक्षकांना फोन करून माहिती दिली. तात्काळ निरीक्षक साहेब आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले आणि त्यांनी झाडावरील कावळ्याला खाली उतरवले. अलगद पाय आणि पंख यातून मांजा बाहेर काढत कावळ्याला मोकळ्या हवेत सोडून दिले.

इकबाल मणियार, स्वच्छता मुकादम, वॉटरग्रेस, नाशिक महानगरपालिका

- Advertisment -

ताज्या बातम्या