Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसरकारी कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाख

सरकारी कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाख

पिंपळगाव ब.। वार्ताहर | Pimpalgoan

शासकीय सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी कर्मचारी बँकेची (Nashik Zilha Sarkari Karmachari Bank) कर्जमर्यादा 13 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिरीष भालेराव (Shirish Bhalerao), उपाध्यक्ष दिलीप सलादे (Dilip Salade) यांनी दिली. यासह वाहनकर्ज व सोनेतारण कर्जाची मर्यादाही (loan Limits) वाढवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले…

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रात शताब्दी महोत्सव साजरा करणारी शासकीय सेवकांची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी ही पहिली बँक ठरली आहे.

शतक महोत्सवाची सांगता व धनशताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाले. 101 वर्षांत बँक पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने सभासदांच्या मागणीनुसार बँकेच्या संचालक मंडळाने कर्जमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियमित कर्जाची मर्यादा आता 13 वरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय झाला. यासह वाहन कर्ज 15 लाख रुपये तर सोने तारण कर्ज 5 लाख रुपये देण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत झाला.

या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष भालेराव, उपाध्यक्ष सलादे यांनी दिली. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, दिलीप थेटे, दीपक आहिरे, प्रवीण भाबड, अजित आव्हाड, दिलीप शिंदे,

सुभाष पगारे, संदीप पाटील, महेश धुळे, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने, मंगेश पवार, प्रशांत कवडे, मंदाकिनी पवार, धनश्री कापडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पाटील, व्यवस्थापक आण्णासाहेब बडाख उपस्थित होते.

शासकीय सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या सहकारी बँकेला कर्जमर्यादा वाढविण्यास मंजूरी मिळाल्याने पतसंस्था सभासदांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी शासकीय सेवकांसाठी अवघे 13 लाख रुपयांची मर्यादा होती.

मात्र आता ही मर्यादा 2 लाख रुपयांनी वाढली असली तरी मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजार, घर खर्च आदी सारासार विचार करता कर्जमर्यादा 20 लाख रुपयापर्यंत वाढवावी, अशी मागणीही काही सेवकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या