Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik ZP Reservation : जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत जाहीर; महिलांसाठी ३७...

Nashik ZP Reservation : जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत जाहीर; महिलांसाठी ३७ गट आरक्षित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) एकूण ७४ गटांची आरक्षण (Reservation) सोडत आज (सोमवार दि.१३) रोजी कालिदास कलामंदिर येथे काढण्यात आली. यातील ३७ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये १० ओबीसी महिला प्रवर्गासाठी, सर्वसाधारण ९, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी १५ आणि अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तीन गट आरक्षित झाले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या निवडणुकाही या २०१७ च्या २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसारच व्हाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने वाढवलेले गट व गणांची संख्या व महापालिका प्रभाग संख्याही न्यायालयाने रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने जुन्या पद्धतीने गट व गणांसह महापालिका प्रभाग गट निश्चित केलेले आहेत. त्यामुळे एकूण जागांपैकी ५० टक्के जागा खुल्या प्रवर्गाला (महिलांसह) तर, उर्वरित ५० टक्क्यांत सर्व प्रवर्गाच्या आरक्षणासह आरक्षण काढण्यात आले आहे.\

YouTube video player

जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) एकूण १९ जागा

कसबे सुकेणे (निफाड) –

कळवाडी (मालेगाव) – (म).

नांदूर शिंगोटे (सिन्नर) –

साकोरी निंबायती (मालेगाव) – (म).

पळसे (नाशिक) –

उगाव (निफाड) – (म)

सोमठाणे (सिन्नर) –

ब्राम्हणगाव (बागलाण) – (म).

चांदोरी (निफाड) – (म).

दाभाडी (मालेगाव) –

ठेंगोडे (बागलाण) – (म).

खाकुर्डी (मालेगाव) – (म).

सायखेडा (निफाड) – (म)

वडाळीभाई (चांदवड) –

पाटोदा (येवला) –

दापूर (सिन्नर) – (म).

जायखेडा (बागलाण) –

माळेगाव (सिन्नर) –

तळेगाव रोही (चांदवड) – (म).

अनुसूचित जाती – एकूण ०५ जागा

एकलहरे (महिला)

राजापूर (महिला)

लासलगाव (महिला)

रावळगाळ (पुरूष).

दुगाव (पुरूष)

अनुसूचित जमाती – एकूण २९ जागा

आंबे

कोहोर (म)

ठाणापाडा (म).

कनाशी (म)

कोचरगाव

अहिवंतवाडी

कळवण मानूर (म)

हरसूल

हातगड

सूरगाणा – ठाणगाव (म)

त्रिभूवन (म)

उंबरठाण (म)

खंबाळे

अभोणा (म)

ताहराबाद (म).

वडनेर भैरव (म)

अंजनेरी

पुनदनगर, कळवण (म)

गिरणारे

धामणगाव

विरगाव (पु)

विल्होळी (म)

उमराळे

कसबे वणी

नांदगाव सदो (म).

उंबरठाण

वाडीवऱ्हे

खेडगाव (म)

मोहाडी

बागलाण मानूर (म)

सर्वसाधारण – एकूण २१ जागा

नामपूर – (म)

झोडगे – (म)

सौंदाणे –

निमगाव

लोहणेर

उमराणे (म).

खर्डे वा.

धोडांबे (म)

साकोरा (म)

न्यायडोंगरी

भालूर

जातेगाव (म) नांदगाव

नगरसूल

अंदरसूल (म)

मुखेड

पालखेड

विंचूर (म)

नांदूर मध्यमेश्वर

घोटी बु.

मुसळगाव (म)

ठाणगाव

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...