Friday, May 17, 2024
Homeक्रीडाआंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या खेळाडूंची विजयी घोडदौड

आंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या खेळाडूंची विजयी घोडदौड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अशोका युनिव्हर्सल स्कूल,अर्जुन नगर मधील खेळाडूंनी आपली विजयी घोडदौड सुरु ठेवत बक्षिसांचा जणू पाऊस पडला आहे. पुणे येथेनुकत्याच संपन्न झालेल्या सीआयएसई (CISCE) आंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अशोकाच्या १६ खेळाडूंनी ३१ हून अधिक पदके आणि चषके जिंकली…

- Advertisement -

विजेत्यांमध्ये सिद्धार्थ ढोमसे, निषाद राव, जीत ठाकूर, रुद्र पोरिया, दिशा देवगिरे,ओवी निकम, तन्मय राठोड, आदित्य कुवर, स्मिथ चौरे, अथर्व खैरे, ऐश्वरी वाळुंज, देवांशी काळे, ईश्वरी खैरे,ओजस सांगले, तनिष्का महामानव यांचा समावेश आहे.

या स्पर्धांमध्ये लांब उडी,१०० मीटर,२०० मीटर,३०० मीटर,६०० मीटर,१५०० मीटर,आणि ३००० मीटरशर्यती आणि रिले स्पर्धांचा समावेश होता.अशोकाचा खेळाडू अथर्व हा स्पर्धेच्या सुरुवातीला विजय सलामी देणारा खेळाडू ठरला. त्याने चार सुवर्णपदके जिंकत १७ वर्षांखालील गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला.त्याचप्रमाणे रुद्र पोरियाने चार सुवर्णपदके जिंकली आणि १९ वर्षांखालील गटातसर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बक्षीस मिळवले.

मुलींच्या गटात ओवीने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले,तर ईश्वरीने एकसुवर्ण आणि दोन कांस्य पदके जिंकली.प्रशिक्षक आणि मार्गदर्शक बाळासाहेब शिरफुले म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा विजय मिळवला आहे. हे विद्यार्थी मी पाहिलेले सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत आणि नाशिक शहर तसेच शाळेचे नाव उज्वल करतील याची मला सुरुवातीपासूनच खात्री होती. विद्यार्थ्यांनी मिळवल्याने या दैदिप्यमान यशामुळे माझ्या संपूर्णकार्यकाळातील २०२२ हे अत्यंत उल्लेखनीय वर्ष ठरले आहे.

उपप्राचार्या डॉ. प्रिया डिसोझा,मुख्याध्यापक प्रमोद त्रिपाठी,क्रीडाविभागप्रमुख भूपेश देशमुख यांच्यासह शाळा व्यवस्थापन आणि शाळा प्रमुखांनीविद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शिरफुले यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. सर्व युवा विजेत्यांची श्रेणी चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या