Friday, May 17, 2024
Homeनाशिकराष्ट्रीय अग्निशमन दिन विशेष : आगीवर नियंत्रण मिळवणे हाच निर्धार

राष्ट्रीय अग्निशमन दिन विशेष : आगीवर नियंत्रण मिळवणे हाच निर्धार

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

सीमेवरील जवान जसा जीवाची पर्वा न करता शत्रूवर तुटुन पडतो. तशीच मानसिकता आगीशी झुंंज देतांना अग्निशमन जवानांची झालेली असते. जीव गेला तरी बेहत्तर पण आग विझवायची असाच निर्धार प्रत्येकाचा असतो. 24 तास सतर्क राहून नागरिकांच्या जीवीत व मालमत्तेचे रक्षण करणारे जवानही एक प्रकारे देशसेवा करत असतात.

- Advertisement -

आज राष्ट्रीय अग्निशमन दिन(National Firefighter’s Day ). त्या निमित्ताने अग्निशमन जवानांच्या मानसिकतेचा वेध घेतला असता वरील बाब प्रकर्षाने समोर आली. आपले अनुभव कथन करताना जवान म्हणाले की, शहरात झोपडपट्टीत जेव्हा आग लागते तेव्हा अरुंंद गल्ल्या असतात. कधी सिलेंडर, ज्वालाग्राही पदार्थाचा भडका होईल याची शाश्वती नसते. जो तो जीव घेऊ पळत असतो.

मात्र जवानांना पळ काढता येत नाही. कितीही धोका दिसत असला तरी आगीत शिरुन आग विझविणे एवढेच ध्येय असते. जीव गेेला तरी चालेल मात्र आग विझवायची एवढाच ध्यास असतो. त्यामुळेच आग आटोक्यात येते. घटनेच्या वेळी आमच्या समोर फक्त आगीशी झुंज देणे एवढेच आम्हाला ठावूक असते.त्यातून सुखरुप बाहेर येऊ याची कोणालाच शाश्वती नसते. मात्र जिवीतहानी न होता आग आटोक्यात आल्यानंतर मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.

विविध जनजागृतीचे कार्यक्रम

शहीदांच्या पराक्रमाची आठवण व्हावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालयांमध्ये हा दिन साजरा केला जातो. या दरम्यानच्या काळात नागरिकांना आगीमुळे होणार्‍या नुकसानीची माहिती व्हावी, आगीपासून बचाव कसा करावा, खबरदारी कशी घ्यावी याचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रांचा वापर, आग लागल्यास प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षितता आदी बाबी शिकविल्या जातात.

शहिदांच्या पराक्रमाची आठवण

भारतामध्ये दरवर्षी 14 एप्रिल हा अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. 14 एप्रिल 1944 साली फोर्टस्टीकेन या मालवाहू जहाजाला अचानक आग लागली. या जहाजातून युद्धसामुग्री आणि स्फोटकांच्या कापसाच्या गाठींनी वाहतूक केली जात होती. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे 66 जवान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आढळून आले. देशातील ही सर्वात मोठी दुर्घटना होती. या जवानांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ देशात दरवर्षी 14 एप्रिल रोजी अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने आठवडा भर अग्निशमनाबाबत जनजागृतीसाठी अग्निसुरक्षा सप्ताहाचेही आयोजन केले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या