Friday, May 3, 2024
Homeनाशिकसूचना विज्ञान अधिकारी राजेश साळवे यांचे निधन

सूचना विज्ञान अधिकारी राजेश साळवे यांचे निधन

नाशिक l प्रतिनिधी Nashik

येथील जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयातील जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राजेश साळवे (National Informatics Center officer rajesh salve passes away) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. सकाळी ते ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले होते….

- Advertisement -

मात्र, अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असल्यासारखे त्यांना वाटले. त्यामुळे काही वेळ आराम करून मग ऑफिसला जाण्याचे त्यांनी निश्चित केले. मात्र, यादरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सन १९९१ साली केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागात ते रुजू झले होते. साळवे हे जिल्ह्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे कार्य बघत होते. करोनाच्या काळात सर्व सरकारी कामे ऑनलाइन पद्धतीने होत होती.

त्यामुळे साहजीकच जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी ती जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. त्यांचे अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, तसेच विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner radhakrishna game) जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या