Monday, June 15, 2026
Homeराजकीयमोठी बातमी! NDA चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार 'या' तारखेला ठरणार; मोदी, नड्डांवर महत्वाची...

मोठी बातमी! NDA चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ‘या’ तारखेला ठरणार; मोदी, नड्डांवर महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली | New Delhi

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीपद (Vice President) रिक्त झाले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ०९ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान (Voting) होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून, एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी कोण उमेदवार असेल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

- Advertisement -

त्यानंतर आता या चर्चांना लवकरच पूर्ण विराम मिळणार असून, येत्या १२ ऑगस्ट रोजी एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचे (Candidate) नाव जाहीर केले जाणार आहे. एनडीएची आज (गुरुवारी) बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एनडीएतील सर्व घटक पक्षांनी एकमताने या दोघांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा (Resignation) दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य चेहर्‍याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे एनडीएकडून कोणत्या नेत्याची निवड होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बैठकीला या नेत्यांनी लावली हजेरी

आजच्या एनडीएच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल, जेडीयूचे नेते राजवी रंजन सिंह, लल्लन सिंह, शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी, टीडीपीचे नेते तथा केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, आरएलएसपीचे नेते उपेंद्र कुशवाह, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

‘असा’ आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

०७ ऑगस्ट २०२५ – निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर
२१ ऑगस्ट २०२५ – उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख
२५ ऑगस्ट २०२५ – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
०९ सप्टेंबर २०२५ – मतदान सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पार पडणार असून, त्याचदिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...