Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; टेक ऑफनंतर घडली दुर्घटना, विमानात...

मोठी बातमी! एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; टेक ऑफनंतर घडली दुर्घटना, विमानात होते 242 प्रवासी

नवी दिल्ली | New Delhi

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर विमान कोसळल्याची मोठी विमान दुर्घटना (plane crash) घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात हे प्रवासी विमान (passenger aircraft) कोसळलं असून या दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे (Air India) १७१ हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad) लंडनला जात होते. एका झाडाला विमानाचा (Plne) एक भाग अडकल्यामुळे ही दुर्घटना घडली असून, विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली आहे. ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झाले तो सर्व परिसर नागरीवस्तीचा असून, शेजारी सरकारी रूग्णालय असल्याचे सांगितले जात आहे. तर  अपघातानंतर विमानतळाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने जवळील सरकारी रूग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले असून, यात अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे समजते. तसेच सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) असल्याची माहिती समोर आली आहे.

टेक ऑफनंतर पाच मिनिटांत विमान कोसळलं

अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी या विमानाने लंडनसाठी उड्डाण केले. यानंतर पाच मिनिटांतच
अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे १५ किलोमीटर असून याठिकाणीच हा अपघात घडला. अपघातग्रस्त हे एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलायनर ७८७ हे विमान ११ वर्षे जुनं असल्याची माहिती समोर आलेली आहे.

अमित शाहांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विमान अपघाताची माहिती मिळताच त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करुन घटनेची माहिती घेतली. तसेच, पोलीस आयुक्त यांच्यासह गुजरातच्या गृहमंत्र्यांना फोन करून बचावकार्य करण्यास सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासनही अमित शाह यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...