Friday, February 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi : भारतीय एआय आता जगासाठी - पंतप्रधान मोदींचा विश्वास

PM Narendra Modi : भारतीय एआय आता जगासाठी – पंतप्रधान मोदींचा विश्वास

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारताची विविधता आणि व्याप्ती ही जागतिक संशोधनासाठी एक आदर्श चाचणी भूमी आहे. जे एआय मॉडेल भारतात यशस्वी ठरते, ते जगाच्या पाठीवर कुठेही लागू केले जाऊ शकते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एआय क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे दर्शन घडवले. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, काही लोक एआयला घाबरतात, तर काही त्यात भविष्य पाहतात; पण भारत एआयमध्ये मानवतेचे उज्ज्वल भविष्य पाहत आहे. आम्हाला एआयचे लोकशाहीकरण करायचे आहे, जेणेकरून माणूस हा केवळ डेटाचा एखादा बिंदू किंवा कच्चा माल बनून राहणार नाही. एआय हे सर्वांच्या सुख-समृद्धीचे साधन बनले पाहिजे. पंतप्रधानांनी भारताला केवळ वापराचे केंद्र न मानता डेव्हलपमेंट हब म्हणून सादर केले. चिप निर्मितीपासून ते क्वांटम कॉम्प्युटिंगपर्यंत भारत प्रत्येक साखळीत मजबूत होत आहे. डिझाइन आणि डेव्हलप्ड इन इंडिया हे सूत्र आता मानवतेच्या कल्याणासाठी जगाला अर्पण करण्याची भारताची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या अनिबंध वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी मानव व्हिजन ही नवीन फ्रेमवर्क जाहीर केली.

YouTube video player

रिलायन्स करणार १० लाख कोटींची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंससंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्याप्रमाणे रिलायन्सने मोबाइल डेटाच्या किमती कमी केल्या, त्याच पद्धतीने आता एआयचे दरही सर्वसामान्यांसाठी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. जिओ आणि आरआईएल मिळून एआयमध्ये पुढील ७ वर्षांत १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

मॅक्रॉन यांची भारतावर स्तुतीसुमने

जागतिक एआय समिटमध्ये (AI ​​Summit) बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताला एक सांस्कृतिक शक्ती म्हणून संबोधले. १० वर्षांपूर्वी बँक खाते नसलेला मुंबईतील फेरीवाला आज मोबाईलवर डिजिटल पेमेंट स्वीकारतो, ही भारताने घडवून आणलेली मोठी क्रांती असल्याचे त्यांनी सांगितले. १४० कोटी लोकांना डिजिटल ओळख मिळवून देणे हे जगाला अशक्य वाटणारे काम भारताने करून दाखवले, असेही ते म्हणाले.

आता भारतातच राफेल निर्मिती

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी भारतासोबतच्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घेषणा केली आहे. आता राफेल लढाऊ विमाने मेक इन इंडियाअंतर्गत भारतातच तयार केली जातील. दोन्ही देश राफेल जेट कार्यक्रम पुढे नेण्यास उत्सुक आहेत. भारतात होणारे हे संयुक्त उत्पादन भविष्यातील ऑर्डरचा मुख्य आधार ठरेल. भारत-फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी ही केवळ संरक्षण संबंधांपुरती मर्यादित नाही, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. इंडिया एआय समिटदरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ताज्या बातम्या

Supreme Court : मोफतपेक्षा रोजगार द्या; खैरात वाटणाऱ्या राज्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi जर सरकार (Government) सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न, गॅस आणि वीज वाटत राहिले, तर लोक काम का करतील? यामुळे...