Friday, May 3, 2024
Homeधुळेमहागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन

महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन

धुळे । Dhule प्रतिनिधी

महागाई (Inflation) व मोदी सरकार विरोधात (Modi government) घोषणाबाजी (Proclamation against) करीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (Nationalist Youth Congress) आंदोलन करण्यात आले. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपासमोर निदर्शने करुन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई नियंत्रण आणण्यासह उपाययोजना कराव्यात, पण त्यात केंद्र सरकारला (Modi government) अपयश येत आहे. महागाई विरोधात आज आंदोलन करण्यात आले. याची दखल घेतली नाही. तर आणखी तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात अध्यक्ष मयुर बोरसे, शेख अमित, शेख एजाज, आनंद पाटील, सागर पाटील, दुर्गेश कोळी, रोशन शेख, वाल्मिक मराठे, स्वप्निल पाटील, निखिल वाघ, परेश पाटील, कल्पेश सुलवाडे, कार्तीक मराठे, राहूल देसले, लोकेश पाटील, निरज हिंगणे, मयुर कासार, किशोर जयस्वाल आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या