Monday, July 1, 2024
Homeनंदुरबारनवापूरनजीक कारमध्ये निर्घृण हत्या

नवापूरनजीक कारमध्ये निर्घृण हत्या

नवापूर – Navapur – श.प्र :

- Advertisement -

येथील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहरालगत टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाजवळ गुजरात पासिंग कारमध्ये एका व्यक्तीची निर्घुण हत्या झाल्याने परिसारत खळबळ उडाली आहे. नवापूर पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेह गुजरातच्या सुरत येथील भावेश मेहता याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहरालगत टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाजवळ गुजरात पासिंगची सियाज कार (क्र.जी.जे.05 टीसी 0017) महामार्गावर रस्त्याच्या मधोमध उभी दिसून आली.

प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ नवापूर पोलिसांना फोन करून बोलावले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कारची तपासणी केली असता, कारच्या मागच्या सीटवर खाकी रंगाची प्लास्टिक चिकटपट्टीच्या सहाय्याने तोंड बांधून शरीरावर हातापायावर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला. मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसांनाही धक्काच बसला.

यावेळी पोलिसांनी अगदी बारकाईने पाहणी केली. त्यात काही कागदपत्रे मिळून आले. बीएसएनएलच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या मधोमध कार उभी करून कारची चावी घेवून मारेकरी फरार झाले होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मृतदेहाला कारमधून बाहेर काढून जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन कक्षात नेले.

मिळालेल्या कागदपत्रांवरुन मयत व्यक्ती हा भावेश सी.मेहता (रा. 05 घनश्याम नगर सोसायटी, भटाररोड सुरत) असल्याचे निष्पन्न झाले. भावेश मेहताचे नातेवाईक गुरुवारी रात्री उशिरा नवापुरात दाखल झाले होते. भावेशचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या हत्येमागचे कारण काय? भावेश मेहताचा खून कुणी केला असावा? मृतदेह कारसह नवापुरात सोडून द्यायचे कारण काय? याबबत पोलीस अधिक तपास करीत आहे. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली असून पोलीस मृत्यूमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.या घटनेमुळे नवापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या