Tuesday, July 23, 2024
Homeजळगावशहापूर येथे अनैतिक संबंधातून विधवा महिलेचा खून

शहापूर येथे अनैतिक संबंधातून विधवा महिलेचा खून

जामनेर -प्रतिनिधी-

- Advertisement -

तालुक्यातील शहापूर येथे सोमवार, दि. १ जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहापूर पुरा भागात राहणाऱ्या विधवा महिलेचा तिच्याच घरात दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे पोलीस पथकासह जाऊन त्यांनी आरोपीस तळेगाव येथून ताब्यात घेतले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगीताबाई पिराजी शिंदे (वय 36) रा. शहापूर, तालुका जामनेर. ही विधवा महिला आपल्या एक मुलगा व एक मुलगी अशा आपल्या दोन मुलांसह शहापूर पुरा भागात गावाच्या बाहेर राहते. या महिलेचे तळेगाव येथील किरण संजय कोळी उर्फ लहान्या (वय 28) रा. तळेगाव तालुका जामनेर यांच्यासोबत बऱ्याच महिन्यापासून अनैतिक संबंध असल्याची परिसरात चर्चा होती. संशयित आरोपी किरण उर्फ लहान्या चे महिलेच्या घरी नेहमी येणे जाणे असल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे संशयितआरोपी संगीताबाई पिराजी शिंदे हिचे घरी मद्य धुंद अवस्थेत आला. या दोघांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाण वरून मोठा वाद झालाअसे कळते. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित आरोपी किरण उर्फ लहान्या ने महिलेच्या डोक्यात दगड टाकून व लाकडी दंडुक्याने तिला मारहाण करून तिचा खून केला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी संशयित आरोपी किरण उर्फ लहाने यास तळेगाव येथून अटक करून ताब्यात घेतलेआहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्होची नोंद करण्यात येत असून पोनी किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक रोटे हे पुढील तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या