Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनवापूर : ड्रेनेजचे काम केल्याशिवाय काम होऊ देणार नाही !

नवापूर : ड्रेनेजचे काम केल्याशिवाय काम होऊ देणार नाही !

नवापूर – Navapur – श.प्र :

नवापूर शहरातील वॉर्ड क्रमांक 6 येथे नवीन डांबरी रोडचे काम करण्याअगोदर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात यावे, अन्यथा नवीन रोडचे काम होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

नवापूर शहरातील वार्ड क्रमांक 6 टर्नल प्लॉट येथील श्रीराम मेडिकल ते हासिमभाई खुर्शीवाला, परदेशी सायकल मार्ट ते डॉ.खपली यांच्या घरापर्यंत नवीन ड्रेनेज लाईन मंजुर करण्यात यावी, अशी मागणी प्रभाग 6 मधील रहिवांशांनी मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक 6 येथील रहिवाशांनी दि.23 जून 2020 रोजी निवेदन दिले होते.

परंतु त्यावर आजपावेतो कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच आता पुढील आठवड्यापासून सदर परिसरात डांबरी रोडचे काम सुरु होणार आहे.

या ठिकाणी असलेली ड्रेनेज लाईन पूर्णतः नादुरुस्त झालेले असून ते तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील पाणी जाण्यास जागा नसल्याने सदर ठिकाणी पाणी रस्त्यावर तुंबते.

त्यामुळे नवीन डांबरी रोडचे काम करण्याअगोदर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात यावे, अन्यथा आनवीन रोडचे काम होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर इरफान युसुफ मुल्ला, फैजल शेख, इस्माईल रंगुनवाला, जावेद शेख, राकेश मिस्त्री, साजीद बारडोलीया, फरजाना मुल्ला, मोहम्मद मुल्ला, मोहसीन मुल्ला, फिरोज सुका आदी रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या