Monday, May 6, 2024
Homeनगरनवनागापुरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

नवनागापुरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवनागापुरच्या चेतना कॉलनी येथे घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. वेश्याव्यवसाय चालविणार्‍या महिलेला ताब्यात घेत अटक केली आहे. दोन पीडित मुलींची सुटका केली आहे.

- Advertisement -

नवनागापूरच्या चेतना कॉलनी येथे राहत्या घरात एक महिला वेश्या व्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले यांना मिळाली होती. त्यांनी एमआयडीसीचे सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली. वेश्याव्यवसाय चालवणार्‍या महिलेला ताब्यात घेत अटक केली आहे. सदर महिलेविरूध्द एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई सहा. निरीक्षक सानप, पोलीस अंमलदार नितीन उगलमुगले, विष्णू भागवत, राजू सुद्रीक, किशोर जाधव, उमेश शेरकर, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास, मनीषा काळे, सोनाली जाधव यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या