Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याराणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; काय आहे प्रकरण?

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत…

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा मिळाला होता.

मात्र नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आहे. या प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जारी केलेले हे वॉरंट बेलेबल असले तरी येत्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी जर दोघेही गैरहजर राहिले तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या