Friday, May 3, 2024
Homeनगरवढणे वस्ती परिसर भाविकांनी फुलला

वढणे वस्ती परिसर भाविकांनी फुलला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरकरांचे ग्रामदैवत असलेल्या शहरातील वॉर्ड नं. 7 मधील वढणे वस्ती येथील कालिका माता आणि मांढरादेवी (काळूआई) मंदिरात नवरात्रोत्सवास मंगलमय आणि उत्साहात सुरूवात झाली. पहाटे आणि रात्रीच्या आरतीस भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने हा परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.

- Advertisement -

नवरात्रोत्सवानिमित्त रोज पहाटे 6 वाजता आणि रात्री आठ वाजता देवीची आरती होत असल्याने मंगलमय वातावरण तयार झाले आहे. तसेच मंदिरात सप्तशती पाठाचे वाचन करण्यात येते. तसेच दुपारी भजने होतात. नवरात्रोत्सव असल्याने या परिसरात फुले, हार, खेळण्या, रांगोळ्यांची दुकाने थाटली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक श्री.व सौ. संदीप मिटके, प्रांताधिकारी श्री.व सौ. अनिल पवार यांच्यासह तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. कोणतीही वर्गणी न घेता हा उत्सव पार पाडला जातो. भाविकांसह कालिका मित्रमंडळ, नगरपालिका, पोलीस यांचे सहकार्य मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या