Thursday, May 2, 2024
Homeनगरएनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार भत्ता वाढला

एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार भत्ता वाढला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रीय छात्र सेना योजनाअंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांच्या अल्पोपहार भत्त्याच्या दरात सरकारने वाढ केली आहे. प्रत्येक 40 मिनिटांच्या परेडसाठी सध्या 5 रुपये याप्रमाणे अल्पोपहार भत्ता दिला जातो. यात वाढ करून आता 15 रुपये करण्यात आला आहे. हे सुधारित दर 1 नोव्हेंबर 2021 पासून असतील.

- Advertisement -

या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध भत्ते दिले जातात. महागाई असल्याने अल्पोपहार भत्त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या