Wednesday, October 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNCP Ajit Pawar Candidate List : अजित पवारांच्या यादीत 'या' आमदाराचे नाव...

NCP Ajit Pawar Candidate List : अजित पवारांच्या यादीत ‘या’ आमदाराचे नाव नाही; तिकीट मिळणार की नाही

मुंबई | Mumbai
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवारांची साथ देणाऱ्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश नाही. या यादीत नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे अजितदादा यांनी नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलिक यांना तिकीट मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगातून जाऊन आलेले नवाब मलिक यांना शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून तर त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी १०० टक्के मिळणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या नावाचा समावेश नाही. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे अजितदादा यांनी नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलिक यांना तिकीट मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नजीब मुल्ला यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीतील ३८ उमेदवारांची नावे
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन- आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे


खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले – किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके


जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड – राजेस पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या