Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याअधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड! अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला

अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड! अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीतील फुटीला १५ दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांनी भेटायला गेले आहे. विशेष म्हणजे उद्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी बाकावरील जवळपास ४० आमदार सत्ताधाऱ्यांना सामील झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या जातीय दंगली, शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणचे संकट कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आदी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची आयती संधी असताना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ घटले आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या