Friday, October 4, 2024
Homeमुख्य बातम्याप्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी - शरद पवार

प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी – शरद पवार

मुंबई | Mumbai

राज्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta Foxconn project) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) जाणे दुर्दैवी आहे. या प्रकल्पासाठी तळेगाव हीच योग्य जागा होती. तसेच या प्रकल्पाचे ठाकरे सरकावर खापर फोडणे चुकीचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उद्य सामंत (Minister Udya Samant) यांचे आरोप चुकीचे असल्याचे पवार म्हणाले.

तसेच आता या प्रकल्पावर चर्चा करून काहीही उपयोग नसून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मदत केली तर त्यांचे स्वागतच करू असेही पवारांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, गुंतवणुकीसाठी (investment) महाराष्ट्र योग्य राज्य असून वाद झाले तर राज्यात गुंतवणूक येणार नाही. याशिवाय गुंतवणुकदारांशी संवाद देखील वाढवायला हवा. तसेच नव्या सरकारची गतिमानता चांगली आहे. मात्र सरकारचा कारभार दिसला नसून राज्यकर्ते गतिमान असल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले. तर आताच्या सरकारने राज्यात नवा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावा असेही पवारांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या