Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : तुम्ही सर्व परत या, मी अन् जयंतराव बाहेर पडतो;...

NCP Crisis : तुम्ही सर्व परत या, मी अन् जयंतराव बाहेर पडतो; जितेंद्र आव्हाडांची भावनिक साद

मुंबई | Mumbai

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या अशा वागण्याने राष्ट्रावादी शरद पवार गटामधील अनेक पदाधिकारी त्यांना परत येण्यासाठी भावनिक साद घालत आहेत. अशात आता राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना परत बोलवत मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांना या वयात त्रास देऊ नका, मी आणि जयंत पाटील बाजूला होतो, तुम्हाला राजकारणात दिसणार नाही, तुम्ही परत या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केले आहे.

- Advertisement -

आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरले असे त्यांना वाटते. पण मी शरद पवात यांच्या गुप्त किंवा मुख्य बैठकांना कधीच नसायचो. माझी इच्छाही नसायची. कारण माझे ठरले होते की त्यांनी केले तर त्यांच्यासोबतच राहायचे. ते जो निर्णय घेतील त्यांच्यासोबतच राहायचे. त्यामुळे मी बैठकांना जायचे टाळायचो. आपल्या कानावर काही गोष्टी पडतील, त्या सहन होणार नाहीत. त्यामुळे आपण लांबच राहावे. पण आता जर ते म्हणत असतील आम्ही आवतीभोवती आहे म्हणून त्रास होतो, तर आम्ही बाजूला होतो, असे आव्हाड म्हणाले. आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरल्यामुळे हे सर्व झाले आहे, तर तुम्ही परत या…मी निघून जाईन, अशी मी येवल्यात जाऊन शपथ घेईन, असे त्यांनी सांगितले. ७५ वर्षे काम केल्यानंतर माझे बाबा घरी बसले आणि ते परत कधी उठले नाही. त्यामुळे काम न करता घरी बसल्यावर काय होते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे जादूगार असलेल्या पवार साहेबाना घरी बसा बोलणे हे मनाला वेदना देणारे आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. आज शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात पार पडत आहे. शरद पवार या सभेमध्ये काय बोलणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या