Monday, May 6, 2024
HomeनगरNCP Crisis : क्रियाशिल सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न

NCP Crisis : क्रियाशिल सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी पक्षामध्ये पवार काका-पुतण्या गटात फाटाफुट झाल्यानंतर राज्यात पक्षीय आणि संघटना पातळीवर दोन गट पडले आहेत. राज्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात नगर जिल्ह्यात अशी स्थिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादीमधील संघटना पातळीवरील मोठ्या गटाने शरद पवार यांचा सोबत राहण्याचा निर्धार केला आहे. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्षीय संघटना अजूनही भक्कम दिसत आहे. या पक्षीय संघटनेच्यावतीने आता पुढील न्यायालयीन लढाईसाठी जिल्ह्यातील पक्षाचे क्रियाशील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे काम हाती घेतले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेतृत्व कोण करणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

मागील रविवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप होत राष्ट्रवादी काँग्रेस पवार काका- पुतण्या अशा दोन गटात विभागली गेली. यानंतर पक्षाचे आमदारांनी मोठ्या संख्येने पुतण्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यात नगर जिल्ह्यातून नगर शहर, पारनेर मतदारसंघाच्या आमदारांचा समावेश आहे. दुसरीकडे अद्याप कोपरगाव, शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील नेत्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे या तालुक्यातील आमदार, नेते आणि संघटना पातळीवर कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत राहणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट असल्याचे जिल्हा राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी शेवगावचे माजी आ. नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले या बंधूनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतरही आपले पत्तेखुले केलेले नाही. यामुळे त्यांचा प्रभाव असणार्‍या शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादा की काका शरद पवार यापैकी कोणाच्या सोबत राहणार हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशीच अवस्था कोपरगाव तालुक्यातील असून तेथील आमदार आशुतोष काळे परदेशात असल्याने या तालुक्यातील राष्ट्रवादीची राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याचे जिल्हा राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. उर्वरित जिल्ह्यात राजकीय नेत्यांसोबत पक्ष संघटनेतील तालुकानिहाय असणार्‍या क्रियाशील सदस्यांना शरद पवार यांच्या गटासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्यांच्याकडून 100 रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येत आहे. भविष्यात हेच प्रतिज्ञापत्र न्यायालयीन लढाईसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून अद्याप जिल्हाध्यक्ष पदासाठी अद्याप कोणाचे नाव समोर आलेले नाही. जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी अजितदादा गटाकडून जाण्याचा निर्णय घेतला असून त्याठिकाणी त्यांना संधी मिळणार असल्याचे चर्चा आहे.

दूर झाली कटूता! धनंजय मुंडेंचं औक्षण करताना पंकजा मुंडे भावुक, Video आला समोर

नगर जिल्ह्यात साधारणपणे 15 हजारांच्या जवळापास क्रियाशिल सदस्यांची राष्ट्रवादीकडून नोंदणी यापूर्वी करण्यात आलेली होती. यात एका क्रियाशिल सदस्यांच्या मागे 10 पक्षाचे प्राथमिक सदस्य आहे. म्हणजेच राष्ट्रवादीच्या 10 प्राथमिक सदस्यांनी पक्षाची प्राथमिक सदस्य झाल्यानंतर त्यांच्यातून एकाला क्रियाशिल सदस्य होता येत होते. यामुळे आता राष्ट्रवादीमधील पवार काका गटाने मोठ्या संख्याने क्रियाशिल सदस्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करण्याची मोहिम हाती घेतली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यातून जास्ती जास्त क्रियाशिल सदस्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करून ते शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेसकडून सांगण्यात आले.

लंकेंना संधी मिळाल्यास विखेंची अडचण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पारनेरचे आमदार नीलेश लंके अथवा त्यांच्या समर्थकाला जिल्हाध्यक्षपदावर संधी मिळाल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाची मोठी राजकीय अडचण होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये काका-पुतण्या गट होण्याच्या आधीपासून पालकमंत्री विखे आणि आ. लंके यांच्यात चांगलाच राजकीय संघर्ष पेटलेला असून यात आता राज्यातील बदल्या राजकीय समिकरणानंतर विखे पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे लंके अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यास विखे यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.

पुणे शहरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पाकिस्तानच्या संपर्कात, अनेक वर्षांपासून करत होता हा उद्योग

- Advertisment -

ताज्या बातम्या