Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : शरद पवार यांची आज येवल्यात पहिली जाहीर सभा, वर्मावर...

NCP Crisis : शरद पवार यांची आज येवल्यात पहिली जाहीर सभा, वर्मावर बोट ठेवणाऱ्या भुजबळांना काय उत्तर देणार?

मुंबई | Mumbai

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांनी पक्षात उद्भवलेल्या बंडाच्या दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तिथेच त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. आजपासून शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

शरद पवार हे आज छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात आपली पहिली सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूट येथील पहिल्याच सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी भुजबळांनी वसंतदादा पाटील, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत वर्मावर बोट ठेवलं होतं. यानंतर आता शरद पवार याबद्दल काही भाष्य करणार का हे पाहावे लागेल.

सभेचे टीझर रिलीज

सभेच्या पार्श्वभूमीवर आता रोहीत पवारांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे. रोहीत पवार म्हणाले की, योद्धा निघाला रणांगणावर.. विचारांच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईसाठी… असे रोहीत पवार यांनी ट्विट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या