Sunday, May 19, 2024
Homeनगरझेडपी, पंचायत समितीच्या इच्छुकांनी जास्ती जास्त सभासद नोंदून दाखवा

झेडपी, पंचायत समितीच्या इच्छुकांनी जास्ती जास्त सभासद नोंदून दाखवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येत्या तीन महिन्यांत राज्यात कधी निवडणूका लागू शकतात. यासाठी राष्ट्रवादीचे जास्त जास्त सदस्य नोंदणी करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक असणार्‍यांनी जास्ती जास्त सदस्य नोंदवून दाखवत आपल्या मागे किती मतदार आहेत, हे दाखवून द्यावे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजराथला गेले. यामुळे या सरकारच्या विरोधात येत्या 20 तारेखला राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर युवक राष्ट्रवादीने मोर्चा काढावा आणि राज्य सरकारला जाब विचारावा असे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नगरमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये रविवारी सायंकाळी उशीरा त्यांनी जिल्ह्यातील पक्षाची स्थिती आणि तालुकानिहाय सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी आ. आशुतोष काळे, आ. संग्राम जगताप, आ. नीलेश लंके, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला जिल्हा निरिक्षक वैशाली नागवडे, माजी नरेंद्र घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांनी आधी तालुकानिहाय एकत्रित आढावा घेतला. सध्या पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असून ज्या तालुक्यात पक्षाचे आमदार आहेत. अशा ठिकाणी अडीच हजारांपेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट त्यांनी दिले आहे. येत्या तीन महिन्यांत राज्यात निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने तातडीने सदस्य नोंदणीसह प्रत्येक तालुक्यात पक्षाच्या पदाधिकारी यांनी स्वत: जावून आढावा घेण्याचे आदेश दिले. तसेच जिल्ह्यात पक्षाच्या सदस्य नोंदणीची धूरा पक्षाच्या युवक आघाडीने आपल्या खांद्यावर घेण्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीमुळे राज्यातील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजराथला गेला याचा जाब विचारण्यासाठी पुढील आठवड्यात 20 तारखेला युवक राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे धोरण पक्षाचे असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. ग्रामीणच्या आढावा बैठकीनंतर रात्री उशीरा प्रदेशाध्यक्षांनी नगर शहरातील पक्षाचा आढावा घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या