Thursday, May 2, 2024
Homeनाशिकराष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच पदाधिकारी भिडले; नाशिक शहरातील प्रकार

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच पदाधिकारी भिडले; नाशिक शहरातील प्रकार

file photo

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा वर्धापनदिन साजरा होत असतानाच नाशिक येथील कार्यालयात दोन पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार भर कार्यक्रमात आज (दि.10) सकाळी घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वर्धापनदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच महिला शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी शहराध्यक्ष पक्षाच्या कार्यक्रमांना जाणीवपुर्वक डावलत असल्याची तक्रार माजी आ. पंकज भुजबळ यांच्याकडे केली.

आपण महिला शहराध्यक्ष असतानाही पक्षाच्या वर्धापन दिनासाठी आम्हाला बोलावण्यात आले नाही. तर इतर पदाधिकार्‍यांना दोनवेळा कॉल करून बोलवण्यात आले.

शहराध्यक्ष हा प्रकार जाणीवपुर्वक करत असल्याची तक्रार त्यांनी केली. ही तक्रार ऐकल्यानंतर शहराध्यक्ष रंजन ठाकरे याांंनीही आपली बाजु मांडली, यावेळी त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनास मोजक्या पदाधिकार्‍यांना बोलवण्यात येणार होते.

यासाठी कार्यालयातूनच ठराविक लोकांना दुरध्वनी करण्यास सांगण्यात आले होते. या लोकांमध्ये महिला शहराध्यक्षांनाही दुरध्वनी करण्यात आला होता. मात्र कॉलच न लागल्याने निरोप पोहचला नसल्याचे त्यांनी सांगीतले.

परंतु, यातून अधिक आरोप प्रत्यारोप वाढत जाऊन दोन्ही पदाधिकारी ऐकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. येथे उपस्थित पदाधिकार्‍यांनी त्यांना आवरत दोघांनाही समजावून सांगितले.

परंतु सत्ताधारी पक्षातील जिल्हा कार्यालयात पक्षाच्या दोन मोठ्या पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या या राड्याची मोठी चर्चा शहरात रंगली होती. तसेच या प्रकारातून पक्षांतर्गत असलेली दुफळीही समोर आली आहे. जिल्ह्यात पक्षाचे नवे, जूने पदाधिकारी, त्यांची निवड व दुफळी हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे.

या प्रकरणी दोन्ही पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या पालकमंत्री छगन भुजबळ तसेच प्रदेशाध्यक्षांकडे याची तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भुजबळ जिल्ह्यातच यात समेट घडवणार की, या वादाला राज्यस्तरीय स्वरूप येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या