Friday, May 17, 2024
Homeनगरअकोलेत अजित पवारांचा ताफा अडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

अकोलेत अजित पवारांचा ताफा अडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

अकोले l प्रतिनिधी

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रचार सभेसाठी आले आहेत.

- Advertisement -

अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला.

२०१९ साली राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या मधुकर पिचड आणि सिताराम गायकर यांच्या विरोधात अजित पवार यांनी सभा घेत सिताराम गायकर यांचे धोतर फेडणार अशी वल्गना केली होती. मात्र आता अकोले सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचडांपासून बाजूला होत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सिताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले आहेत.

या गोष्टीचा जाब सभेच्या स्टेजवर जाऊन विचारणार असल्याचं शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी इशारा दिला होता. त्यामुळे सकाळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या विरोधात शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि अजित पवार यांचा ताफा अडवला. पोलीसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर अजित पवार सभास्थळी पोहचले.

- Advertisment -

ताज्या बातम्या