Thursday, May 22, 2025
Homeमुख्य बातम्याVaishnavi Hagawane Case : "मी दोषी असेल तर..."; वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित...

Vaishnavi Hagawane Case : “मी दोषी असेल तर…”; वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

नेमकं काय म्हणाले?

पुणे | Pune 

- Advertisement -

पुण्यातील मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) (Vaishnavi Hagawane ) हिने सासरच्या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

वैष्णवी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) नेत्याची सून होती. तसेच अजितदादांनी या लग्नाला हजेरी देखील लावली होते. राजेंद्र हगवणेसोबत (Rajendra Hagawane) अजित पवारांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना पाठिशी घातल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली जात आहे. त्यानंतर आता बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका मांडत या प्रकरणावर भाष्य केले आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की,”तुम्ही अनेक जण मला लग्नाला (Wedding) बोलावता. मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेसोबत वेडेवाकडं केलं, तर त्यात अजित पवारचा काय संबंध आहे. अजित पवारांनी सांगितलं का? असं कर म्हणून मला तर कळतच नाही. मी घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि म्हटलं कोणी का असेना कारवाई करा. तसेच पोलिसांना (Police) देखील कारवाई करायला सांगितली. सगळे आरोपी अटकेत आहेत. तिचा सासरा पळून गेला आहे, पण पळून पळून जाणार कुठं? या सगळ्यात माझा काय संबंध? मी दोषी असेल तर मलाही फासावर लटकवा. पण माझी का बदनामी करता?” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “लग्नात मला गाडीची (Car) चावी द्यायला सांगितली. मी चावी देताना स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असं विचारलं होतं. मग माझी बदनामी का करता. गुन्हा नोंद झाला असून, सीपींना कारवाई झाली पाहीजे असे सांगितले आहे. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलं आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, माझा सभासद असेल तरी त्याची हकालपट्टी करतो”, असेही अजित पवारांनी म्हटले.

वैष्णवीची आत्महत्या की घातपात?

वैष्णवीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी राजेंद्र हगवणे याचा मुलगा शशांकने पत्नी वैष्णवीला पाइपने मारहाण केली असून, शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे वैष्णवीचा खून झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिश्मा यांच्या पोलिस कोठडीत २६ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील फरार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : जिंदाल कंपनीतील आग तिसऱ्या दिवशीही धुमसतीच; परिसरात धुराचे...

0
नाशिक | Nashik  नाशिक-मुंबई महामार्गालगत (Nashik-Mumbai Highway) असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री १ वाजता आग लागली होती. ही आग (Fire) विझवण्यासाठी प्रशासानाकडून अथक प्रयत्न...