Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवारांची 'ती' भीती खरी ठरली! राष्ट्रवादीचा 'हा' नेता BRS च्या गळाला

अजित पवारांची ‘ती’ भीती खरी ठरली! राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता BRS च्या गळाला

मुंबई | Mumbai

दोन दिवसांपूर्वी बीआरएस आणि एमआयएमला हलक्यात घेण्याची चूक करू नका असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला होता. अखेर याच बीआरएसने राष्ट्रवादीला (NCP) पंढरपूरमध्ये मोठा दणका दिला आहे. अजित पवारांची ती भीती खरी ठरत आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) हे २७ जूनला पंढरपुरच्या दौऱ्यावर असून ते आपल्या मंत्रिमंडळासोबत विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते भगीरथ भालके (Bhagirath Bhalake)यांच्या गावी आयोजित शेतकरी मेळाल्याला संबोधित करणार आहेत, आणि याच शेतकरी मेळाव्यात भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Jayant Patil : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने व्हिडिओ शेअर करत सांगितले १० कारणे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या सोलापूर दौऱ्यापासूनच भगीरथ भालके हे पक्षावर नाराज असल्याचं बोलले जात होते. या दौऱ्यावेळी शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अभिजीत पाटील (Abijit Patil) यांना उमेदवारी देण्याचे संकेतही दिले होते. तेव्हापासूनच भागीरथ भालके राष्ट्रवादीवर नाराज होते व तेव्हापासूनच ते बीआरएसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा ही होत्या. मात्र, अखेर आता त्यांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निश्चित केले आहे.

दरम्यान, भागीरथ भालके हे पंढरपूरचे माजी आमदार भारत भालके यांचे पूत्र असून २०१९ च्या निवडणूकीत भागीरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या