Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे यांना करोनाची लागण

एकनाथ खडसे यांना करोनाची लागण

मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली. काही दिवसांपुर्वी त्यांच्या मुलीस करोना झाला होता.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांना करोना झाल्यामुळे उपचारांसाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असेही आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खडसे उपचारासाठी दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना आणि त्यांच्या मुलीलाही करोना संसर्ग झाला. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली होती. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.

खडसेंनी इतरांना केले काळजी घेण्याचे आवाहन

एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील खडसेंनी केले आहे. दरम्यान, मी लवकर कोरोनावर मात करून परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या