मुंबई | Mumbai
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काल माध्यमाशी बोलतांना तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi Government) पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता, असे म्हणत गंभीर आरोप केला होता.
हे देखील वाचा : ठाकरे पिता-पुत्रांसह अजित पवारांना खोट्या प्रकरणांत अडकवण्यासाठी फडणवीसांचा दबाव; अनिल देशमुखांचे गंभीर आरोप
त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देशमुखांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना, गेल्या दोन दिवसांपासून आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. देशमुख हे जेलमध्ये होते, आता बेलवर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, असे म्हटले होते. यानंतर आता अनिल देशमुख यांनीही फडणवीसांना प्रतिआव्हान दिले आहे.
हे देखील वाचा : माझ्यावर वेळ आली तर मी ते ऑडिओ…; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
यावेळी बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, “काल देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत बोललो, माझावर दबाव होता असे वक्तव्य केले. अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही. कशा पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला. आमच्या नेत्यांवर आरोप करण्यात सांगितले. याचे सर्व पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा दबाव होता, यात माझाकडे एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात पुरावे आहेत,” असे देशमुखांनी सांगितले.
हे देखील वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार; अनेकांच्या घरांत शिरलं पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या
पुढे बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की माझ्याकडेही व्हिडिओ क्लीप आहेत. त्यामध्ये मी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत काही बोललो. माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे त्यांनी त्या व्हिडीओ क्लिप जाहीर कराव्या. त्यानंतर वेळ आल्यावर मी हे पुरावे दाखवेल,” असे अनिल देशमुख म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा