Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमाझ्यावर वेळ आली तर मी ते ऑडिओ…; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

माझ्यावर वेळ आली तर मी ते ऑडिओ…; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई | Mumbai
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन जळगावचे एसपी प्रविण मुंढे यांना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. अनिल देशमुख यांचे ऑडिओ आणि व्हिज्युअल आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की कशाप्रकारे गिरीश महाजनांवर मोक्का लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. हे गुन्हे दाखल करायला लावले. यासंदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी दिले होते, त्यावरच सीबीआयकडे केस झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासह कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे ही मोडस ऑपरेंडी होती’, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

‘अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं. महाविकासआघाडी सरकार होतं, ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीससमोर लागली, मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीसनी अनिल देशमुखांविरोधात एफआयआर करायला लावला, त्यांच्या सरकारमध्ये तो एफआयआर झाला त्यानंतर जे जेलमध्ये गेले आणि आता ते बेलवर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीत. १०० कोटीच्या वसुलीमध्ये ते बेलवर बाहेर आले आहेत’, असे फडणवीस म्हणाले आहेत.

“मी आजवर बोललो नव्हतो. अनिल देशमुख सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत. तरीही मी कधी बोललो नाही. कारण मी कुणावरही डुख धरून राजकारण करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी माझ्या नादी लागले तर सोडत नाही”, असेही आव्हान फडणवीस यांनी दिले.

अनिल देशमुख यांना इशारा देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “मी एखाद्यावर राग ठेवून राजकारण करत नाही. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही. अनिल देशमुख यांच्या पक्षाच्याच काही लोकांनी मला ऑडिओ-व्हिडिओ आणून दिले आहेत. त्यात अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंबाबत काय बोललेत, शरद पवार यांच्याबाबत काय बोललेत, सचिन वाझेवर काय बोललेत, हे सगळं आहे. माझ्यावर वेळ आली की हे ऑडिओ व्हिडिओ मी सार्वजनिक करणार आहे.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : विधानसभा तिकीटाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या नावाखाली काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल विलास भुजबळ (वय 42 रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता,...