Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांची टीका; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “इतना तो...

शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांची टीका; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “इतना तो हक बनता है…”

मुंबई | Mumbai

शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्रत्युत्तर देत आहेत. जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंनी मोदींच्या टीकेवर मिश्किल टिप्पणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणांच्या माध्यमातून पवार साहेबांची स्तुती केलेली आहे. मोदींनीच पद्मविभूषण दिलं आहे. शेतीमधील कामासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात आल्यावर ते पवार साहेबांचं नाव घेतात. कधी टीका करून तर कधी प्रेमाने नाव घेत असतात. पण राजकारणात एवढं तर चालतंच. ”इतना तो हक बनता है’. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना मोदी नेहमी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींनी करप्शनचा आरोप आमच्यावर केला नाही. असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.

दरम्यान, जयंत पाटील यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “किती हा विरोधाभास? शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात शरद पवारांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती”, असं जयंत पाटील एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या व्हिडीओमध्ये “शरद पवारांच्या डोक्यात गाव, शेतकरी, शेतीतील आधुनिकता यावर कायम विचार राहतात. शरद पवारांची शेतीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची पद्धत आहे”, असं मोदी सांगताना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या