Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRamraje Naik Nimbalkar : अजित पवारांना धक्क्यांवर धक्के; रामराजे नाईक निंबाळकर तुतारी...

Ramraje Naik Nimbalkar : अजित पवारांना धक्क्यांवर धक्के; रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?

मुंबई | Mumbai
विधान सभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ पहायला मिळत आहे. त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. निंबाळकर फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर रामराजे त्यांची भूमिका जाहीर करणार आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधून विधानसभेसाठी इच्छूक होते. परंतु अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवार जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. रामराजे नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. २०१५ ते २०१६ आणि २०१६ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत ते विधान परिषदेचे १३ अध्यक्ष होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे.

रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवार यांची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या