Friday, November 22, 2024
Homeनगरअकोले, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, राहुरी व पारनेरमध्ये शरद पवार गटाचे उद्यापासून शक्तीप्रदर्शन

अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, राहुरी व पारनेरमध्ये शरद पवार गटाचे उद्यापासून शक्तीप्रदर्शन

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभेचे फुंकणार रणशिंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतून उद्या गुरूवार 26 व शुक्रवार 27 सप्टेंबरला शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. शिवस्वराज्य यात्रांच्यानिमित्ताने जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघांत समर्थकांशी संवाद साधत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यात उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले आणि दक्षिण नगर जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, नगर शहर, राहुरी व पारनेर या पाच मतदार संघांचा समावेश आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. डॉ.अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह जिल्ह्यातील खा. निलेश लंके,आ. प्राजक्त तनपुरे, आ.रोहित पवार, आजी-माजी आमदार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका पदाधिकारी या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेच नियोजन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे. गुरुवारी 26 रोजी सकाळी 10 वाजता अकोले तालुक्यातील कोतूळ येथे शिवस्वराज्य यात्रेची पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता शेवगाव येथील खंडोबा मैदानात (खंडोबानगर) येथे दुसरी जाहीर सभा होणार आहे आणि सायंकाळी श्रीगोंदा येथील संत मोहंमद महाराज मैदानात तिसरी सभा होणार आहे.

या यात्रेचा मुक्काम नगर शहरात होणार असून, दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.27) सकाळी 10.30 वाजता टिळकरोड सभा होणार आहे. येथून ही यात्रा शिर्डीकडे रवाना होणार असून तेथे साई समाधी मंदिरात दर्शन घेतल्यावर दुपारी 4 वाजता राहुरी येथील नवी पेठेत जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोर सभा होणार आहे. तेथून ही यात्रा पारनेरकडे रवाना होणार आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे सायंकाळी सभा होणार आहे. तेथून ही यात्रा पुणे किंवा इस्लामपूरकडे जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ही शिवस्वराज्य यात्रा कर्जत-जामखेड मतदारसंघ व कोपरगाव मतदार संघासह शिर्डी (राहाता) मतदार संघातही जाणार असून, तेथेही जाहीर सभांचे नियोजन आहे.

आठ जागांवर दावा
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा जाहीर सभा होत असलेल्या अकोले, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, नगर शहर, राहुरी व पारनेर या सहा मतदारसंघांसह कर्जत-जामखेड व कोपरगाव अशा आठ जागांवर दावा केला आहे. काँग्रेसच्या वाट्याला संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी (राहाता) अशा तीन जागा असल्या तरी त्यातील शिर्डीची जागाही लढवण्याची तयारी शरद पवार गटाची आहे व त्याबदल्यात काँग्रेसला जिल्ह्यातीलच दुसरी एखादी जागा देण्याचीही तयारी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या