Friday, April 25, 2025
Homeनाशिकमहाराष्ट्रात आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येतील

महाराष्ट्रात आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येतील

येवला (प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे. जनतेला देशाचे संविधान वाचवायचे आहे. महागाईवर, बेकारीवर जनता प्रचंड त्रासली आहे. जीएसटी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. गॅस महागला, पेट्रोल महागले, डिझेल महागल. आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील. याचा मनस्वी राग जनतेला आहे. म्हणून जनता भाजपा विरोधी काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -
महाराष्ट्रात आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येतील; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

येवला दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष पाटील पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. केंद्र सरकारची शेतकरी धोरण चुकीची. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिले तिथे खर्च दुप्पट झाला. खत महागले, अवजार महागली. शेतकऱ्यांना भरडण्याच काम पाच वर्ष केल. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकरी भाजपा विरोधात काम करत आहे, असे पाटील म्हणाले.एका प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्या त्या ठिकाणी वाईट अनुभव आला. निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन दिवसात सर्वच प्रकारांचा अवलंब केला गेला. सरकारी यंत्रणा, पोलीस अधिकारी व निवडणूक आयोग यांच्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आल्या. कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही ही आमची प्रमुख तक्रार आहे. निवडणूक आयोग डोळे झाक करते. बीड, परळीत आमच्या उमेदवाराने री पोलची मागणी केली आहे. प्रशासन, निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही.

नाशिक जिल्ह्यातील जनता आघाडी बरोबर आहे. दिंडोरी मतदार संघात आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे. तर येवला मतदारसंघात आघाडीला साठ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केला. पत्रकार परिषद प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...