Sunday, October 6, 2024
Homeराजकीयभ्रष्टाचार कुठे करायचा याचं तारतम्य सरकारला राहिलेले नाही; शरद पवारांची महायुतीवर टीका

भ्रष्टाचार कुठे करायचा याचं तारतम्य सरकारला राहिलेले नाही; शरद पवारांची महायुतीवर टीका

मुंबई | Mumbai

दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांसह शिवप्रेमींकडून राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते गेल्यानंतर तिथे भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि भाजपाचे नेतेमंडळी पोहोचली. यामुळे राजकोट किल्ल्यावर दोन तास तणाव निर्माण झाला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले

या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत ताशेरे ओढले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, सरकारला कुठे भ्रष्टाचार करायचा याचे तारतम्य राहिलेले नाही. सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे, त्यामुळे ते नाकारू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, पुतळ्याच्या उद्घाटनासाठी प्रामुख्याने राज्य सरकारचे प्रतिनिधी तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी होते. यामुळे जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण करत नाही. कुणी सांगत आहे की वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळे पुतळा कोसळला. परंतु, ज्या ठिकाणी पंतप्रधान गेले तिथे किती मोठया प्रमाणात भ्रष्टाचार खोलवर गेला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे या सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, असेही शरद पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा :  शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ‘नॉट रिचेबल’

हे तर कमीशनखोर सरकार – पटोले

राज्यातील महायुती सरकार (Mahayuti Government) कमीशनखोर आहे. जेव्हा पुतळ्याचे अनावरण केले जात होते त्यावेळी प्रोसिजर फॉलो केली गेली नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याचे काम केले गेले .मुख्यमंत्री म्हणतात की, यापेक्षा मोठा पुतळा उभा करू, मात्र जे पाप तुम्ही केलं त्याचं काय? असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या