Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJayant Patil: डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? जयंत...

Jayant Patil: डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? जयंत पाटलांचा इंधन टंचाईवरुन राज्य सरकारवर संताप

मुंबई | Mumbai
गेल्या पाच दिवसांत केंद्र सरकारने दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. 15 मे रोजी देशात पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. 19 मे) पुन्हा एकदा देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ करण्यात आली. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच दुसरीकडे मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप किंवा डिझेल पंपावर इंधन नसल्याकारणाने नागरिक रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात इंधन नसल्याकारणामुळे घडणाऱ्या विविध घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

PM Narendra Modi : इटली आणि भारत संबंधाचा नवा अध्याय

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी X या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “जळगावमध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू खुपसला. बुलढाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोकं 12 तास लाइनमध्ये उभे राहिले, अकोलाच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूर मध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाही… चालय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का?” असे लिहित संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे याबाबत शासन किंवा सरकारमधील नेतेमंडळी नेमके काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये राज्यातील विविध भागांत इंधन टंचाईमुळे उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर परिस्थितीवर बोट ठेवले आहे. त्यांनी थेटपणे आपल्या पोस्टच्या माध्यमातून डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? असा खोचक सवालही विचारला आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai "ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे....