Saturday, October 24, 2026
HomeनाशिकShalarth ID Scam : बाेगस मान्यतांचा खेळ; जळगावचा माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून अटकेत 

Shalarth ID Scam : बाेगस मान्यतांचा खेळ; जळगावचा माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून अटकेत 

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातून (Nashik Division Office) गाजलेल्या ‘शालार्थ’ घोटाळ्यात नाशिक एसआयटीने (Nashik SIT) शुक्रवारी(दि. २४) मोठी कारवाई केली. या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर (वय ६६, रा. निर्मला रेसिडेन्सी, पिंपराळा रोड, जळगाव) यांना धुळ्यातून शुक्रवारी अटक केली आहे. नाशिकरोड न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

संशयित शशिकांत हिंगोणीकर हे सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव (Jalgaon) येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील एकूण २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा कोणताही प्रस्ताव कार्यालयात प्राप्त नव्हता. असे असतानाही त्यांनी या सर्व २५९ जणांना परस्पर बनावट वैयक्तिक मान्यता प्रदान केल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या घोटाळ्याच्या तपासात, मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील (School) ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे समोर आले होते. ‘बॅक डेटेड’ (मागील तारखेचे) आदेश दाखवून शासनाच्या तिजोरीतून तब्बल १६० कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या व्यापक गुन्ह्यात आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले असून यामध्ये शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, वेतन पथकाचे अधिकारी यांच्यासह अनेक मोठे मासे अडकले आहेत. यापूर्वी प्रशांत वाडीले या मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली होती, ज्याने बनावट आदेशांवर उपसंचालकांची स्वाक्षरी घेण्यासाठी मध्यस्थी केली होती.

या पथकाची कारवाई

यापूर्वी अटक (Arrested) केलेला एजंट प्रशांत वाडीलेच्या तपासात व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित शशिकांत हिंगोणीकर धुळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) तथा एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांच्या सूचनेने वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक निरीक्षक उमेश बाेरसे, उपनिरीक्षक किरण शेवाळे व गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने कारवाई करत हिंगाेणीकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असून शिक्षण क्षेत्रातील या आर्थिक भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...