Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिलेंडरची तिरडी काढत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

सिलेंडरची तिरडी काढत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

नाशिकरोड | Nashik

गॅस दरवाढीच्या (Gas Price Hike) विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे (District President Prerana Balkawade) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. नाशिक तालुक्याचे (Nashik Taluka) आंदोलन सिन्नर फाटा येथे करण्यात आले…

- Advertisement -

गॅस सिलेंडर चे भाव वाढल्याने जनता होरपळून निघाली आहे. केंद्र सरकारने (Central Government) जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. महागाई चे चटके सर्वाधिक महिलांना सोसावे लागत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, इंधनवाढ, गॅसवाढ आणि यामुळे हतबल झालेला सर्वसामान्य व्यथित झाला आहे.

आजपर्यंत कर्जबाजारीमुळे आत्महत्या (Suicide) होत होत्या. परंतु या पुढे “महागाईचे बळी”पडतील असे भितीदायक वातावरण आहे. त्यामुळे महिला रस्त्यावर उतरून विरोध करीत असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

नशिक सिन्नर फाटा येथे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या उपस्थितित आंदोलन (Agitation) प्रसंगी सिलेंडरची तिरडी काढून महिलांनी निषेध व्यक्त केला.

गॅस दरवाढ थांबली नाही तर महिलांवर आत्महत्येची वेळ येईल. आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, पण या महागाईमुळे आता महिलांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याची जबाबदारी मोदी साहेब घेणार का? असा प्रश्न प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी केला. तर महिला आंदोलकांनी सरकारचा निषेध अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या