Thursday, May 2, 2024
Homeनाशिकगॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर

नाशिक दि. १३(प्रतिनिधी) -:  गॅस सिलेंडर चे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, भाजप सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. महागाई चे चटके सर्वाधिक महिलांना सोसावे लागत आहेत.  गॅस दरवाढ झाल्याने नक्की कोणाला “अच्छे दिन” येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे अशी टिका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केली.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने तालुकानिहाय आंदोलन करण्यात आले.  नशिक तालुक्यात भगूर येथे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या उपस्थितित आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने महिलांनी सरकारचा तीव्र निषेध केला.

- Advertisement -

“मोदी तेरे राज मे, जनता बुरे हाल मे,” “केंद्र सरकार हाय हाय,” “मोदीजी का देखो खेल महंगा सिलेंडर, महंगा तेल”, “बहोत हुई महंगाई की मार !!बस करो मोदी सरकार!!”अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.

आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते पण या महागाईमुळे आता महिलांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे याची जबाबदारी मोदी साहेब घेणार का? असा प्रश्न प्रेरणा बलकवडे यांनी विचारला.

यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, रुबिना खान, स्वाती मोरे, राधा जाधव, सुलताना शेख,पद्मा गभाले, मनिषा झांजरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

दुसरीकडे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसनेही आंदोलन छेडले आहे. लवकरात लवकर विनानुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पूर्ववत करावी व होणारी दरवाढ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिकच्या शहराध्यक्षा अनिता भामरे, नगरसेविका समिना मेमन, संगिता गांगुर्डे, सरिता पगारे, सलमा शेख, आशा भंदुरे, पुष्पा राठोड, शाकेरा शेख, रूपाली पठारे, संगिता अहिरे, मिनाक्षी गायकवाड, पुनम शाह, सुजाता गाढवे, स्मिता चौधरी, संगिता पाटील, संगिता सानप, वंदना पाटील, रंजना गांगुर्डे, बबिता सोनवणे, दिक्षा दोंदे, अलका अहिरे, शालिनी जाधव, पंचक्षिला वाघ, शिला कनोजिया, मंगल मोहिते, नेहा सोनवणे, महजबीन शेख, मोनाली साळवे यासह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी  सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या